महत्वाच्या बातम्या

 जनरल स्टोअरमधून सुरू होती अवैध दारूची विक्री : पोलिसांच्या छाप्यात दुकानदार अडचणीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : विसापूर येथील अशोक नगर परिसरातील एका जनरल स्टोअरमध्ये अवैधरित्या देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बल्लारपूर पोलिसांनी छापा टाकून दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी दुकानदाराविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पथक १४ जून रोजी रात्री ८ वाजता पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विसापुर येथील मोटू पतलू जनरल स्टोअर्स येथे धाड टाकली. झडती घेतली असता देशी दारू रॉकेट संत्रा कंपनीच्या ९० मिलीच्या २१ सीलबंद निपा जप्त करण्यात आल्या. 

वया प्रकरणी गजानन नारायण रूपनर (४८), रा. वार्ड क्र. ३, विसापूर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक खरतडे, दयानंद झाडे, पोअं महेश श्रीरामे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos