कळमना परिसरात भीषण अपघात : हैदराबादच्या तिघा तांत्रिक कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : ताडाळी येथील सनविजन अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत क्रेन दुरुस्तीचे काम पूर्ण करून हैदराबादकडे परतणाऱ्या तिघा तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या पिकअप वाहनाला भरधाव टाटा वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. ही घटना ३ जूनच्या मध्यरात्री कळमना घडली.
प्राप्त माहितीनुसार, सनविजन अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड, ताडाळी येथील कंपनीतील नादुरुस्त क्रेन दुरुस्त करण्यासाठी हैदराबाद येथून जाईद अब्दुल खालिद शेख (वय ४०), रियाज हाशीम अहमद (वय ४३) आणि मोहम्मद खादीर अहमद (५४) हे तिघे २ जून रोजी महिंद्रा पिकअप क्रं. टीजी-०८-व्ही-७९०४) या वाहनाने ताडाळी येथे आले होते.
दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर ३ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजता ते हैदराबादकडे रवाना झाले. मात्र मार्ग चुकल्याने ते कळमना गावापर्यंत पोहोचले. तेथे चौकात वाहन वळवत असताना समोरून आलेल्या टाटा कंपनीच्या एमएच-३४-बीझेड-५८२८ क्रमांकाच्या वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत पिकअपला जोरदार धडक दिली.
या अपघातात जाईद अब्दुल खालिद शेख यांच्या छाती, कंबर व कपाळाला गंभीर दुखापत झाली. रियाज हाशीम अहमद यांच्या चेहऱ्यावर, डाव्या भुवईजवळ व कंबरेच्या भागात मार लागला. तर वाहन चालक मोहम्मद खादीर अहमद यांचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले असून उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच नाक व तोंडालाही दुखापत झाली आहे.
अपघातातील जखमींवर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी टाटा वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




