आजचे दिनविशेष


१२ मे महत्वाच्या घटना
१३६४ : पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली.
१५५१ : अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली.
१६६६ : आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.
१७९७ : नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
१९०९ : सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.
१९४१ : बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z3 सादर केले.
१९५२ : प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
१९५५ : दुसरे महायुद्ध – संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
१९६५ : सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.
१९८७ : ब्रिटीश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.
१९९८ : केन्द्र सरकारी कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन वरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.
१९९८ : भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
२००८ : चीनमध्ये ८.० पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपात ६९,००० पेक्षा जास्त लोक मारले गेले.
२०१० : एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१२ मे जन्म
१८२० : परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेंन्स नाईटिगेल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९१०)
१८९५ : भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९८६)
१८९९ : लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल २००२)
१९०५ : कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९८३)
१९०७ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १९९३)
१९०७ : हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २००३)
१९३० : भारतीय नौसेनाधिपती राधाकृष्ण हरिराम तहिलियानी यांचा जन्म (मृत्यू : १४ ऑक्टोबर २०१५)
१८८९ : जर्मन-स्विस व्यापारी, अॅन फ्रँकचे वडील ओटो फ्रँक यांचा जन्म (मृत्यू : १९ ऑगस्ट १९८०)
१८६३ : भारतीय चित्रकार आणि संगीतकार उपेंद्रकिशोर रे यांचा जन्म (मृत्यू : २० डिसेंबर १९१५)
१७६७ : स्पॅनिश जनरल आणि राजकारणी, स्पेन देशाचे माजी पंतप्रधान मॅन्युएल गोडॉय यांचा जन्म (मृत्यू : ४ ऑक्टोबर १८५१)
१२ मे मृत्यू
१९७० : नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सॅच यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८९१)
२०१० : लेखिका तारा वनारसे (रिचर्डस) यांचे निधन.
२०१४ : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक सरत पुजारी यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९३४)
२०२२ : राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार रमेश लटके यांचे निधन
२०१३ : भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते के. बिक्रम सिंग यांचे निधन (जन्म: २६ मे १९३८)
१९८१ : सिंगापूर देशाचे २रे अध्यक्ष, डॉक्टर आणि राजकारणी बेंजामिन शेअर्स यांचे निधन (जन्म: १२ ऑगस्ट १९०७)
१९२२ : भारतीय तत्त्वज्ञ, योगी आणि गुरु मास्टर सी. व्ही. व्ही. यांचे निधन (जन्म: ४ ऑगस्ट १८६८)
News - todayspecialdays




Petrol Price




