महत्वाच्या बातम्या

 पुण्यात स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे.

कोंढवा परिसरातील लुल्ला नगरमध्ये असलेल्या ऑर्किड बिल्डिंमध्ये हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

लालरामन लाफतफळा (वय 21 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर संदीप मोकाशी आणि अमोल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अण्णा माने यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. नगर परिसरातील ऑर्किड बिल्डिंगमध्ये असलेल्या स्पर्श स्पा गुलमोहर या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक बनावट ग्राहक त्या ठिकाणी पाठवून या संपूर्ण प्रकाराची खातरजमा केली आणि या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यांना चार महिला वेश्याव्यवसाय करत असल्याचे दिसून आले. या सर्व महिलांची पोलिसांनी सुटका केली. आरोपींनी जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवून या महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी देखील पोलिसांनी अशाच सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे उघडकीस आल्यानंतर पुण्यातील वारजे-माळवाडी परिसरात ओम स्पावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली होती. त्यावेळी स्पा सेंटरच्या मॅनेजरला पुणे पोलिसांनी अटक केली होती. संदीप संतोष तिवारी (वय 23 वर्षे) असे स्पा मॅनेजरचे नाव होते. वारजे माळवाडी येथील ओम स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्याने इशारा करताच ओम स्पावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला. तेथे दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. संदीप तिवारी या मॅनेजरला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 12 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.

पुण्यात आतापर्यंत अनेक स्पा सेंटर छापा टाकला आहे. अनेक महिलांची सुटका केली आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून या अशा स्पा सेंटरवर पोलिसांची करडी नजर आहे. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यात सापळा रचून अनेकांना जेरबंद केले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos