महत्वाच्या बातम्या

 धानोरा तालुक्यासाठी रुग्णसेवेचा नवा आधार : खासगी रुग्णवाहिकेचे लोकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / धानोरा : धानोरा तालुक्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आज खासगी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय जनता पार्टी, तालुका धानोरा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीचा तसेच जनहिताचा विचार करून हा उपक्रम राबविण्यात आला.

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार Dr. Milind Narote यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले की, ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अनेक अडचणी येतात. अशा परिस्थितीत ही रुग्णवाहिका नागरिकांसाठी मोठा आधार ठरणार असून, गरजू रुग्णांना तातडीने उपचार केंद्रात पोहोचविण्यास मदत होईल.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद व समाधान पाहून मनाला विशेष प्रसन्नता वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जनसेवेचा ध्यास कायम ठेवत नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी सातत्याने कार्य करत राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धानोरा तालुक्यात सुरू करण्यात आलेली ही रुग्णवाहिका सेवा भविष्यात अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos