आजचे दिनविशेष


६ मे महत्वाच्या घटना
१५४२ : सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.
१६३२ : शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.
१८१८ : राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.
१८४० : पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.
१८८९ : पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले.
१९४९ : ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.
१९५४ : रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
१९८३ : अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
१९९४ : इंग्लिश खाडी खालून जाणाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडणाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
१९९७ : बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.
१९९९ : महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
२००१ : पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
२००२ : भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२०१५ : सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका.
६ मे जन्म
१८५६ : ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३९)
१८६१ : मोतीलाल गंगाधर नेहरु भारतीय राजनीतीज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३१)
१९२० : जुन्या पिढीतील संगीतकार गायक बुलो सी. रानी यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९३ – मुंबई)
१९४० : प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबन मिस्त्री यांचा जन्म.
१९४३ : लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर यांचा जन्म.
१९५१ : भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका लीला सॅमसन यांचा जन्म.
१९५३ : ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष टोनी ब्लेअर यांचा जन्म.
१९५५ : भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक ए. के. लोहितदास यांचा जन्म (मृत्यू : २८ जून २००९)
१९०४ : थायलंड देशाच्या संसदेवर निवडून आलेलय पहिल्या महिला ओरापिन चैयाकन यांचा जन्म (मृत्यू : १ जानेवारी १९९६)
१९०३ : टुट्स शोर्स रेस्टॉरंटचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती टूट्स शोर यांचा जन्म (मृत्यू : २३ जानेवारी १९७७)
६ मे मृत्यू
१५८९ : अकबराच्या दरबारातील एक नवरत्न रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन येथे निधन.
१८६२ : अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्री थोरो येथे निधन. (जन्म: १२ जुलै १८१७)
१९२२ : सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचे निधन.
१९४६ : भुलाभाई देसाई राजनीतीज्ञ यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १८७७)
१९५२ : इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ मारिया माँटेसरी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १८७०)
१९६६ : उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)
१९९५ : प्रवचनकार, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आचार्य गोविंदराव गोसावी येथे निधन.
१९९९ : पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे येथे निधन.
२००१ : विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका मालतीबाई बेडेकर यांचे पुणे येथे निधन.
२०२२ : भारतीय राजकारणी, आमदार बोज्जला गोपाला कृष्ण रेड्डी यांचे निधन (जन्म: १५ एप्रिल १९४९)
१८७० : स्कॉटिश वैद्य, क्लोरोफॉर्मचे भूल देणारे गुणधर्माचे संशोधक सर जेम्स यंग सिम्पसन यांचे निधन (जन्म: ७ जून १८११)
News - todayspecialdays




Petrol Price




