मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालयाचा बारावी निकाल उज्ज्वल : विज्ञान शाखेत ९६% यश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : येथील मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विज्ञान शाखेत एकूण ४५ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी ४३ विद्यार्थिनी उत्तीर्ण होत ९६ टक्के निकाल लागला. या शाखेत संयोगिता प्रशांत कायरकर हिने ८२ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. संबोधी आशिष दुर्गे (७७.३३ टक्के) हिने द्वितीय, तर वैष्णवी रमेश कैथल (७३.८३ टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला.
कला शाखेचा निकाल ६६ टक्के लागला असून लुबैना जाकीर शेख (६८.१७ टक्के) हिने प्रथम, वैष्णवी देवराव बुरेवार (५८.६७ टक्के) हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.
वाणिज्य शाखेत ६० टक्के निकाल लागला. या शाखेत दुर्गा इरावेना (५४.५० टक्के) हिने प्रथम, फलकनाझ रजब अली (५१.८३ टक्के) हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच वैष्णवी राजेश शर्मा (५१.६७ टक्के) ही दिव्यांग (CWSN) विद्यार्थिनी असून तिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशाबद्दल बल्लारपूर सेवा समितीचे संस्थापक जैनुद्दीन जव्हेरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या प्राचार्या असमा खान खलीदी सह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
News - Chandrapur




Petrol Price




