महत्वाच्या बातम्या

 गोंदिया : चुलोद-गुदमादर रेल्वे रुळावर अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत चुलोद ते गुदमादर रेल्वे रुळावर शुक्रवारी १ सकाळी ९:३० वाजता एका तरुणाचा मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे वय साधारण ३५ ते ४० वर्षे असून प्राथमिक अंदाजानुसार तो रेल्वेखाली आल्यामुळे ठार झाला आहे.

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे स्टेशन प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रिक्की जयहिंद महावर वय ३५, रा. सावराटोली यांनी पोलिसांना घटनास्थळी येऊन माहिती दिली. या माहितीनुसार ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस घटनास्थळी पोहचून प्राथमिक तपास करत आहेत. मृतदेहाची शिनाखत करण्यासाठी तसेच मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. स्थानिक रहिवाशांना आणि रेल्वे रुळाजवळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Gondia




Related Photos