गोंदिया : ग्राम महालगाव परिसरातील कालव्यामध्ये बुडून युवकाचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम महालगाव परिसरात गुरुवारी ३० सकाळी ८:३० वाजता युवक बुडून ठार झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव संतोष माणिक घनाडे वय ४५, रा. वॉर्ड क्र. ७, अर्जुनी-मोरगाव असे आहे.
संतोष सकाळी घरातून मोटारसायकलने निघाला व सिद्धिविनायक शाळेसमोरील इटियाडोह प्रकल्पाजवळील कालव्याजवळ गेला. स्थानिकांचा अंदाज आहे की, तो कालव्याच्या काठावर मोटारसायकल उभी करून चप्पल काढून पाण्यात हात-पाय धुण्यासाठी पाण्यात उतरला असावा. मात्र, संतोषला पोहता येत नसल्याने आणि तोल गमावल्यामुळे तो पाण्यात वाहून गेला.
घटनास्थळावरून महालगावकडे जाणाऱ्या कालव्यात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर, बंटी माणिक घनाडे (वय ४२) यांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
अर्जुनी-मोरगाव पोलीस घटनास्थळी पोहचून शवविच्छेदनासाठी तयारी करत आहेत आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेसंबंधी सूचना दिल्या आहेत.
News - Gondia




Petrol Price




