महत्वाच्या बातम्या

 फुटपाथ धारकांच्या सन्मानार्थ उपक्रम : आ. सुधीर मुनगंटीवार स्वतः मैदानात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील फुटपाथवर व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना उन्हाळ्यात दिलासा मिळावा या उद्देशाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून विशेष उपक्रम राबविण्यात आला. कडक उन्हात स्वतः उपस्थित राहून त्यांनी फुटपाथ विक्रेत्यांना छत्री व पाण्याचे जार वितरित केले.

बल्लारपूर शहरात अनेक वर्षांपासून फुटपाथवर लहान-मोठे व्यवसाय करणारे विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत. उन्हाळ्यात त्यांना उष्णतेचा तीव्र त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही फुटपाथ धारक तसेच विदर्भातील मोठ्या संडे मार्केटमधील भाजी विक्रेत्यांना ५ लिटर क्षमतेचे पाण्याचे जार व मोठ्या छत्र्या देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या निमित्ताने दुपारी कडक उन्हात स्वतः मैदानात उतरून आ.सुधीर मुनगंटीवार यांनी विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांच्या हस्ते छत्र्यांचे वितरण केले. तसेच सर्व लाभार्थ्यांपर्यंत पुढील दोन दिवसांत छत्री व पाण्याचे जार पोहोचविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

या उपक्रमामुळे फुटपाथ धारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. या वेळी भाजपाचे काशीनाथ सिंह, तसेच समाजसेवक, होलसेल व किरकोळ भाजी विक्रेते तसेच सब्जी मार्केटचे अध्यक्ष नासिर बख्श उर्फ भुरु उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos