'१० ऐवजी १०० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी होणार' : ठाकरे सरकारने शिवजयंतीच्या परिपत्रकातील चूक सुधारली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे संपूर्ण जगात दहशतीचं वातावरण पसरलं आहे, सुरुवातीच्या बहुतांश देशांनी लॉकडाऊन केलं, परंतु आता हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे, लॉकडाऊनमुळे अनेक कार्यक्रमांना मर्यादा आली होती, लग्नसोहळे, समारंभ अशा विविध कार्यक्रमासाठी नियमावली आखून दिली जात होती, कोरोना सध्या नियंत्रणात असला तरी राज्य असो वा केंद्र सरकार विशेष खबरदारी घेत आहे, १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, तत्पूर्वी ठाकरे सरकारने शिवजयंती कशी साजरी करावी यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
मात्र या मार्गदर्शक सूचना देत असताना ठाकरे सरकारला एका चुकीचा फटका बसला आहे, शिवजयंती साजरी करताना केवळ १० जणांच्या उपस्थितीत साजरी करावी असं परिपत्रक गृह विभागाकडून काढण्यात आलं होतं, परंतु ठाकरे सरकारच्या या निर्णयावर शिवप्रेमींकडून टीका होत असताना पुन्हा यातील चूक सुधारत गृह विभागाने दुसरं शुद्धिपत्रक काढलं, यात म्हटलं आहे की, शासन परिपत्रक ११ फेब्रुवारी २०२१ मधील मुद्दा ३ मधील ओळ क्रमांक ४ मध्ये सुधारणा करण्यात येत असून आता १० ऐवजी १०० असे वाचावे, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

 
  Print


News - Rajy | Posted : 2021-02-12


Related Photos