आजचे दिनविशेष


३ एप्रिल महत्वाच्या घटना
१९४८ : ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९७३ : मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाइल कॉल केला.
१९७५ : बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव्ह हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.
२००० : आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
२०१० : ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.
२०१६ : पनामा पेपर्स हे कायदेशीर दस्तऐवज प्रसिद्ध होऊन सुमारे २,१४,४८८ कंपन्याची गोपनीय माहिती उगढ झाली.
२०२४ : Hualien भूकंप २०२४ - तैवान देशाच्या किनारपट्टीवर ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, नऊ लोकांचे निधन आणि ९०० हून अधिक लोक जखमी झाले.
३ एप्रिल जन्म
१७८१ : भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८३०)
१८८२ : सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९२८)
१८९८ : टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लुस यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६७)
१९०३: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९८८)
१९०४ : इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९१)
१९१४ : फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून २००८)
१९३० : जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल्ह यांचा जन्म.
१९३४ : इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ जेन गुडॉल यांचा जन्म.
१९५५: सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांचा जन्म.
१९६२: चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य जयाप्रदा यांचा जन्म.
१९६५ : पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०००)
१९७३ : भारतीय क्रिकेट खेळाडू निलेश कुलकर्णी यांचा जन्म.
१९८९ : श्रीलंकेचे क्रिकेटपटू थिसारा परेरा यांचा जन्म
१९५३ : जपानी ५६वे योकोझुना सुमो पैलवान वाकानोहना कांजी (दुसरा) यांचा जन्म (मृत्यू : १६ जुलै २०२२)
१९५२ : भारतीय चिकित्सक आणि राजकारणी के. कृष्णसामी यांचा जन्म
१९४९ : भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रामा नारायणन यांचा जन्म (मृत्यू : २२ जून २०१४)
१९४८ : मेक्सिको देशाचे ५३वे अध्यक्ष, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी कार्लोस सॅलिनास डी गोर्टारी यांचा जन्म
१९४६ : पोलंड देशाचे पंतप्रधान हॅना सुचोका यांचा जन्म
१९४३ : जपानी अॅडमिरल, जपानच्या स्व-संरक्षण दलाच्या पहिल्या महिला स्टार अधिकारी हिकारू साईकी यांचा जन्म
१९२९ : डेन्मार्क देशाचे ३७वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी पॉल श्लुटर यांचा जन्म (मृत्यू : २७ मे २०२१)
१९२९ : बांगलादेशी अभियंते आणि वास्तुविशारद, विलिस टॉवर आणि जॉन हॅनकॉक सेंटरचे सह-रचनाकार फजलुर रहमान खान यांचा जन्म (मृत्यू : २७ मार्च १९८२)
१९२८ : कॅनेडियन पुजारी, डॅन्स ला रुएचे संस्थापक एमेट जॉन्स यांचा जन्म (मृत्यू : १३ जानेवारी २०१८)
१९२० : जपानी ४३वे योकोझुना सुमो पैलवान योशीबायामा जुंनोसुके यांचा जन्म (मृत्यू : २६ नोव्हेंबर १९७७)
१९१५ : नेदरलँडचे पंतप्रधान, राजकारणी आणि नौदल अधिकारी पीट डी जोंग यांचा जन्म (मूत्यू : २७ जुलै २०१६)
१९१३ : नॉर्वे देशाचे १८वे पंतप्रधान पेर बोरटें यांचा जन्म (मृत्यू : २० जानेवारी २००५)
१९०० : लेबनॉन देशाचे ७वे अध्यक्ष कॅमिल चामून यांचा जन्म (मृत्यू : ७ ऑगस्ट १९८७)
१८८७ : जपानी २४वे योकोझुना सुमो पैलवान ओटोरी तानिगोरो यांचा जन्म (मृत्यू : १६ नोव्हेंबर १९५६)
१८८२ : सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार द्वारकानाथ पितळे यांचा जन्म (मृत्यू : २१ जून १९२८)
१८८१ : इटली देशाचे ३०वे पंतप्रधान, पत्रकार आणि राजकारणी अल्साइड डी गॅस्पेरी यांचा जन्म (मृत्यू : १९ ऑगस्ट १९५४)
१८७६ : बाटा शूज कंपनीचे संस्थापक टॉमस बाटा यांचा जन्म (मृत्यू : १२ जुलै १९३२)
१८१४ : अमेरिकन धार्मिक नेते, चर्च ऑफ जीझस क्राइस्ट ऑफ लेटर-डे सेंट्सचे ५वे अध्यक्ष लोरेन्झो स्नो यांचा जन्म (मृत्यू : १० ऑक्टोबर १९०१)
११५१ : रशियन राजकुमार इगोर स्व्याटोस्लाविच यांचा जन्म
१०१६ : चिनी सम्राट क्सिन्ग झोन्ग यांचा जन्म (मृत्यू : २८ ऑगस्ट १०५५)
३ एप्रिल मृत्यू
१६८० : छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १६३०)
१८९१ : फ्रेन्च गणिती एडवर्ड लूकास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८४२)
१९८१ : पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेजचे संस्थापक जुआन पेप्पे यांचे निधन (जन्म: २७ जून १८९९)
१९८५ : महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १८९३)
१९९८ : इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९००)
१९९८ : प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार हरकिसन मेहता यांचे निधन.
२०१२ : भारतीय राजकारणी गोविंद नारायण यांचे निधन. (जन्म: ५ मे १९१६)
२०१७ : भारतीय शास्त्रीय गायक किशोरी आमोणकर यांचे निधन (जन्म: १० एप्रिल १९३२)
२०१४ : प्रशियाचे राजकुमार प्रिन्स मायकेल यांचे निधन (जन्म: २२ मार्च १९४०)
१९९५ : कॅनेडियन उद्योगपती, कॅनेडियन टायरचे सह-स्थापना आल्फ्रेड जे. बिल्स यांचे निधन (जन्म: १ डिसेंबर १९०२)
१९५० : अमेरिकन इतिहासकार, ब्लॅक हिस्ट्री मंथचे संस्थापक कार्टर जी. वुडसन यांचे निधन (जन्म: १९ डिसेंबर १८७५)
१९४१ : हंगेरी देशाचे २२वे पंतप्रधान, शैक्षणिक आणि राजकारणी पाल टेलिकी यांचे निधन (जन्म: १ नोव्हेंबर १८७९)
१३२५ : सुफी संत निजामुद्दीन औलिया यांचे निधन
११७१ : नाइट्स टेम्पलरचे ७वे ग्रँड मास्टर मिलीचा फिलिप यांचे निधन
११५४ : फातिमिद खलिफाचे वजीर अल-आदिल इब्न अल-सल्लार यांचे निधन
News - todayspecialdays




Petrol Price




