महत्वाच्या बातम्या

 पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा जिल्हावर दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

१३ जुन रोजी सकाळी ११ वाजता वर्धा येथे आगमन व राखीव. दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २.३० वाजता वर्धा येथून देवळीकडे प्रयाण करतील. दुपारी ३ वाजता देवळी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ६ विदर्भ केसरी रामदास तडस इनडोअर स्टेडीयम येथे आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.

१४ जुन रोजी सकाळी ११ वाजता वर्धा येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ वाजता वर्धा येथून नागपूरकडे प्रयाण करतील. 





  Print






News - Wardha




Related Photos