महत्वाच्या बातम्या

 लाखांदूर-वडसा राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघात : दोघे गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / लाखांदूर : लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील सोनी गावाजवळ ३१ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास दुचाकी अपघात घडला. गॉगल विक्री करून लिफ्ट मागून वडसा जात असलेल्या एका दुचाकीस्वाराला मागून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींची ओळख स्वप्नील हिवराज नाकाडे (२६, रा. तोरगाव बु. ता. ब्रह्मपुरी) व अजय रमेश पारधी (४६, रा. गोंदिया) अशी झाली आहे. अपघातानंतर दोघांनाही तात्काळ उपचारासाठी स्थानिक लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांकडून अपघाताची अधिक तपासणी सुरू आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos