महत्वाच्या बातम्या

 नागपूरच्या राज्य आँलिंपीक नेटबॉल स्पर्धेत पुणे व भंडारा संघानी मिळविले विजेतेपद


- पुरुष व महिला मध्ये गोंदियाने पटकावले उपविजेतेपद
- भंडारा व चंद्रपूर तृतीय स्थानी

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आँलिंपीक असोसिएशन द्वारा नागपूरच्या विवेकानंद क्रीडा संकुलात आयोजित महाराष्ट्र राज्य आँलिंपीक नेटबॉल स्पर्धेत पुरुष गटातून पूणे आणि महिला गटातून भंडारा संघांने विजेतेपद मिळवीत सुवर्ण पदक प्राप्त केले. पुरुष व महिला मध्ये गोंदिया संघाने उपविजेतेपद मिळवून रौप्यपदक प्राप्त केले. तर भंडारा, चंद्रपूर संघांनी तृतीय स्थान मिळवीत कांस्य पदक प्राप्त केले. सर्व विजेत्या संघांना महाराष्ट्र राज्य आँलिंपीक क्रीडा स्पर्धेचे निरीक्षक राजेंद्र राऊत, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, महाराष्ट्र राज्य अँम्युचेर नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष बिपीन कामदार, सचिव डॉ. ललीत जिवानी, धनंजय विरुडकर, भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, वर्धा जिल्हा क्रीडा धिकारी लतिका लेकुरवाडे, चैतन्य जिवानी, डॉली जिवानी यांच्या शुभहस्ते विजेत्या संघांना पदक प्रदान करण्यात आले. जिल्हा सचिव एस.एन मुर्ती (वर्धा), शाम देशमुख (भंडारा), सतिष इंगळे (औरंगाबाद), जयदीप सोनखासकर (अकोला), सुनिल कडू (अमरावती), योगेश वाघ (धुळे), मिनेश महाजन (अहमदनगर), संभाजी गायकवाड (उस्मानाबाद), स्वप्नील करपे (नाशिक), समिर शिखिलकर (पुणे ), निखिल पोटदुखे (चंद्रपूर), हैदरअली सैय्यद हे उपस्थित होते. सतिश इंगळे, स्वप्निल करपे, संतोष पाचारणे, अभिजीत देशमुख, विशाल शेळके, रोहन शेळके शुभम पवार, पंकज नायडू, आदित्य नगरीकर, शुभम रंगारी, भागवत उगले, सुदर्शन निमकर, अश्वजीत सोनवणे व ललित सूर्यवंशी यांनी पंच म्हणून काम सांभाळले. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्पर्धा आयोजनात सहकार्य केले.





  Print






News - Nagpur




Related Photos