महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते गुरुपल्ली येथे लाखो रुपयांचे भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : ग्रामपंचायत गुरुपल्ली अंतर्गत पूनागुडा येथे नाली ५ लाख रु., सीसी रोड ५ लाख रु. जवेली येथे जि.प. शाळेची नवीन बिल्डिंग १३ लाख ७२ हजार रु. जि.प.शाळेची दुरुस्ती ५ लाख, नवीन नाली बादकाम ५ लाख रु., डुंमे येथे नाली बादकाम ५ लाख रु. या गावात लाखो रुपयांचे भूमिपूजन संपन्न झाले. 

ग्रा.प. गुरुपल्ली अंतर्गत या गावात जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून मागणी केले, असता मागणीची दखल घेवुन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिले, असून येत्या काही दिवसांत नाली ५ लाख रु., सीसी रोड ५ लाख रु. जवेली येथे जि.प.शाळेची नवीन  बिल्डिंग १३ लाख ७२ हजार रु. जि.प. शाळेची दुरुस्ती ५ लाख, नवीन नाली बादकाम ५ लाख रु. डुंमे येथे नाली बादकाम ५ लाख रु. चे बांधकाम पूर्ण होईल.  

आज जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते सदर बांधकामाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला. या भूमिपूजनाला कैलाश उसेंडी ग्रा.प. गुरुपल्ली, उपसरपंच बाळू आत्राम, सत्तू गावळे सदस्य, संगीत पुंगाटी सदस्य, प्रज्वल नागुलावार आविस एटापल्ली सचिव, रमेश वैरागळे सदस्य ग्रा.प. गेदा तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, अजय गावळे पोलीस पाटील, अनिल करमरकर, देवतळे काका, हेमंत मलिक, संतोष इसंकर, राहुल बिरमवार, जुनेद शेख, मासू उसेंडी गाव पाटील, बिरसु कादो, कार्तिक तलांडे, जयराम इस्टाम, शामराव उसेंडी, गोपिका वेलादी, पपिता मेश्राम, अनिता आत्राम तसेच गावातील नागरिक उपस्तीत होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos