पतीच निघाला मारेकरी, पुलगाव येथील खुनाचा उलगडा, आरोपीस अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा : 
 रेल्वे कॉर्टर तारफैल  पुलगाव येथील  भारती धीरज जांभुळकर या महिलेची हत्या १५ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. तिच्या हत्येची फिर्याद देणारा पतीच मारेकरी निघाला असून काल १८ ऑक्टोबर रोजी त्याला अटक करण्यात आली आहे. धीरज  तुळशीदास जांभुळकर असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने २२ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. 
प्राप्त माहितीनुसार १५ सप्टेंबर रोजी  सकाळी  ८.४५   ते १. १५  दरम्यान आरोपी धीरज  तुळशीदास जांभुळकर याने  पत्नी  भारती धीरज जांभुळकर हिची कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून  रेल्वे कॉटर येथील राहत्या घरात प्रवेश करून  धारदार शास्त्रांनी गळ्यावर, चेहऱ्यावर, डोक्यावर वार करून हत्या केल्याची फिर्याद दाखल केली.   तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी  तपास सुरु केला.  
गुन्ह्याची गंभीरता ओळखून पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्हा दाखल झालेल्या  तारखेपासूनच पाठपुरावा करून आरोपीच्या शोधाकरिता  पुलगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.   घटनास्थळी दाखल श्वानपथक, अंगुलीमुद्रा तज्ज्ञ याना पाचारण करण्यात आले . उपयुक्त माहिती प्राप्त करण्यात आली होती. तसेच गुन्ह्यात गोपनीय बातमीदार लावण्यात आले . प्राप्त पुराव्यांची पडताळणी करण्यात आली.   स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी/ कर्मचारी यांनी मागील ३३ दिवस गुन्ह्याचा सतत तपास करून माहिती प्राप्त केली.  प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष साक्षिदार, फिर्यादी व संशयित आरोपी यांचे संबंधातील व्यक्ती, नातलग, मित्र आसपास  परिसरात राहणारे सराईत गुन्हेगार, शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे आरोपी, परिसरातील नागरिक आदींची कसोशीने व कौशल्यपूर्णरीत्या विचारपूस करण्यात आली. 
काल १८ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाने केलेल्या कारवाईमध्ये तपासादरम्यान नोंदविलेली बयाणे व मिळालेल्या पुराव्यावरून गुन्ह्यात धीरज जांभुळकर हाच  आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.  त्याला अटक करण्यात  आली. आज १९ ऑक्टोबर रोजी  रोजी आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असून आरोपीला २२ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी   मिळाली  आहे. 
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोलीस निरीक्षक एम.पी. बुराडे, यांच्या निर्देशाप्रमाणे पो.उपनि महेंद्र इंगळे, पो.हवा. सलाम कुरेशी, स्वप्नील भारद्वाज, मनीष श्रीवास, जगदीश डफ तसेच पो.हवा. बन्सोड, रवींद्र मुजबैले, अमोल आत्राम, किसना कासदेकर    विकास मुंडे यांनी केली.  

   Print


News - Wardha | Posted : 2018-10-19


Related Photos