महत्वाच्या बातम्या

 रानटी हत्तींच्या कळपाने मका पिकांचे मोठे नुकसान : शेतकऱ्यांमध्ये तणाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगावबंध्या आणि खोळदा परिसरात मागील आठ दिवसांपासून रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालण्याची घटना सुरु आहे. शुक्रवारी २० रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने पुन्हा या परिसरात प्रवेश करून मका पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगावबंध्या आणि खोळदा परिसरात प्रवेश करून मका पिकांचे नुकसान केले. सध्या या परिसरात रब्बी हंगाम सुरू असून मोहफूल व मका पिकांची वेचणी सुरु आहेत. शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमावावे लागल्याने त्यांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

वडेगावबंध्या आणि खोळदा येथील गावकऱ्यांनी आरोप केला आहे की, वन विभागाकडून हत्ती परतवून लावण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना केलेली नाही. शेतकरी रानटी हत्तींच्या कळपाने मका व धान पिकांच्या केलेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करत आहेत.

हत्तींच्या सततच्या धुमाकुळामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी वन विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.





  Print






News - Gondia




Related Photos