महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत पोलीस मदत केंद्राद्वारे भव्य महिला मेळावा व रेला नृत्य स्पर्धा : ५०० हून अधिक सहभागी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली, पेनगुंडा : जागतिक महिला दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराखाली ०९ मार्च २०२६ रोजी पेनगुंडा येथे भव्य महिला मेळावा व रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम नीलोत्पल (पोलीस अधीक्षक गडचिरोली), गोकुळ राज (अपर पोलीस अधीक्षक प्रशासन), एम. रमेश (अपर पोलीस अधीक्षक अभियान), सत्य साई कार्तिक (अपर पोलीस अधीक्षक अहेरी) यांच्या संकल्पनेतून तसेच अमर मोहिते (उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.

पेनगुंडा क्षेत्र अत्यंत संवेदनशील असून पूर्वी माओवाद्यामुळे विकासाच्या कामास गती मिळत नव्हती; परंतु पोलीस मदत केंद्र स्थापनेनंतर या भागात विकासाच्या कार्यक्रमांना गती मिळत असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख ठळक मुद्दे -
अध्यक्षस्थानी मीना गोंगलू, कार्याध्यक्ष लक्ष्मी दोमटवार, प्रमुख पाहुणे पाटील सा. MO तसेच डाक विभाग, डॉक्टर प्रणाली राऊत (मोबाईल मेडिकल युनिट, भामरागड) उपस्थित होते.प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित राहिले, तसेच पोमके हद्दीतील आशा वर्कर, आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाला अंदाजे ४०० ते ५०० महिला व पुरुष उपस्थित होते.

स्मरणांके आणि शुभारंभ -
सावित्रीबाई फुले, स्व. बेबी मडावी व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांनी पोलीस कल्याणकारी योजना, प्रशिक्षण आणि फौजदारी कायद्यांविषयी माहिती दिली. उपस्थित महिलांना आरोग्य, पोषण आणि कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

स्पर्धा व पुरस्कार -
मेळाव्यात रेला नृत्य स्पर्धा आयोजित केली गेली, विजेत्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

स्व. बेबी मडावी यांच्या आई-वडिलांना शाल व साडी देऊन सन्मानित करण्यात आले.

सुविधा व सेवांचा लाभ -

२४ आधार अपडेट, २६ आभा कार्ड वितरण
६० लोकांची आरोग्य तपासणी
१० पोस्ट खाते सुरू करून वितरण
उपस्थित सर्वांसाठी भोजनाची सोय

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस अंमलदार शिवाजी लोणारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रणय ठाकुर व प्रेम बोरुले यांनी करून सांगता केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos