महत्वाच्या बातम्या

 गोंदियात भीषण अपघात, तरुण ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्राम कुडवा येथील यशोदा ढाबा समोर शुक्रवारी (६ मार्च) सकाळी सुमारे ११:३० वाजता झालेल्या अपघातात जिजो जॉयकुट्टी (वय २६, रा. पंचायत समिती कॉलनी, शास्त्री वॉर्ड) या तरुणाचा मृत्यू झाला.

अपघातानंतर जिजो गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता, डॉ. सचिन हुद्दा यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास हवालदार राजू वनवे करत आहेत. पोलिस अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू ठेवले आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos