महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते साहिल रामटेके आता थेट धडकणार टीव्ही चॅनेल वर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : तालुका मुख्यालयापासून ५ किमी अंतरावर असलेल्या तुळशी या गावचे मूळ रहिवासी असलेले ज्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर आपली ओळख केवळ जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केली असे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध युवा व्याख्याते साहिल साक्षकार रामटेके हे आता थेट टीव्ही वरती धडकणार आहेत. 

गत वर्षी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते अभिषेक बच्चन यांच्या युवक बिरादरी भारत या संस्थेचा मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय युवा भूषण पुरस्कार साहिल रामटेके यांनी पटकावला होता आणि त्यामुळे ते अधिक चर्चेत होते. यंदा म्हणजेच येत्या ५ मार्च रोजी राजकुमार बडोले फाउंडेशन तथा लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत बुद्ध फुले-शाहू-आंबेडकर सम्यक विहार नवेगाव, गडचिरोली येथे लाईव्ह महाचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या महाचर्चेत UGC बिल २०२६ शिक्षा में समानता या साजिश ? या महत्त्वाच्या ज्वलंत मुद्द्यावर महाचर्चा होणार असून जिल्ह्यातील होतकरू आणि अभ्यासू असलेल्या व्यक्तींची या ठिकाणी निवड झालेली आहे ज्यामध्ये तुळशी गावचे सुपुत्र साहिल साक्षकार रामटेके हेही प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रबोधन क्षेत्रात साहिल रामटेके यांचे योगदान अतुलनीय असून राष्ट्रीय युवा भूषण पुरस्कार, उत्कृष्ट वक्ता पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार अशा विविध पुरस्काराने साहिल रामटेके यांना गौरवण्यात आले आहे. 

चळवळीच्या क्षेत्रात प्रबोधनाचे कार्य करत असताना मला मिळालेली ही संधी ज्यामुळे माझे विचार अधिक सुसज्ज पणे लोकांपर्यंत पोहोचतील अशी आशा साहिल रामटेके यांनी व्यक्त केली आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील रोहिदास राऊत, एड. कविता मोहरकर, एड. विनय बांबोडे, बाळू टेंभुर्णे यांचाही समावेश आहे. ही महाचर्चा लॉर्ड बुद्धा या टीव्ही चॅनल वरून तसेच लॉर्ड बुद्धा या यू ट्यूब चॅनल वरून ठीक ६:३० वाजता पासून लाइव्ह राहणार आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos