भरधाव ट्रकची रेल्वे फाटक तोड़ून राजधानी एक्स्प्रेसला धडक, ट्रक चालकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
वृत्तसंस्था / भोपाळ :
मध्य प्रदेशमधील रतलामजवळ भरधाव ट्रकने रेल्वे फाटक तोडून राजधानी एक्स्प्रेसला धडक दिल्याने अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून या अपघातामुळे एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले.सदर घटना आज सकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली. एक्स्प्रेसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून प्रवाशांसाठी दुसरी ट्रेन घटनास्थळी रवाना झाली आहे.
रतलाम- गोध्रा दरम्यान भरधाव ट्रकने रेल्वे फाटक तोड़ून त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेसला धडक दिली.  या अपघातात ट्रकचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर भरधाव ट्रकच्या धडकेमुळे एक्स्प्रेसच्या दोन डब्यांचे नुकसान झाले. दोन्ही डबे रुळावरुन घसरले. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.  Print


News - World | Posted : 2018-10-18


Related Photos