महत्वाच्या बातम्या

 अकोला : बारावीच्या भौतिकशास्त्र परीक्षेत सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस, ५८१ विद्यार्थ्यांच्या उत्तरे समान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अकोला : वाशीम जिल्ह्यातील श्री मैनागीरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, टो-जुमडाफाटा येथील बारावीच्या भौतिकशास्त्र परीक्षेत सामूहिक कॉपीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भरारी पथकाच्या अचानक भेटीदरम्यान ५८१ विद्यार्थ्यांच्या उत्तरे एकसारखी असल्याचे उघडकीस आले.

परीक्षा केंद्रावर अत्यंत अडचणीत बसण्याची व्यवस्था, अपुरी प्रकाशयोजना आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता असल्याचे तपासणीत समोर आले. याशिवाय, केंद्रात एक कर्मचारी मोबाईल घेऊन फिरताना आढळला, ज्यामुळे परीक्षेतील गैरव्यवहाराची शक्यता अधिक बळावली.

सामूहिक कॉपीचा प्रकार लक्षात घेऊन शिक्षण विभागाने दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबन आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos