महत्वाच्या बातम्या

 केंद्रीय मंत्रालयाचा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप प्रोग्राम : महामार्ग प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष अनुभवाची संधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालय देशातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रॅक्टिकल अनुभव मिळवून देण्याच्या उद्देशाने इंटर्नशिप प्रोग्राम सुरु करणार आहे. उच्च शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी एकत्रितपणे हा उपक्रम राबवला असून, सध्या देशभरात सुरू असलेल्या १५० महामार्ग प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.

मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी करार करून विद्यार्थ्यांना महामार्ग डिझाइन, बांधकाम प्रक्रिया, प्रकल्प नियोजन आणि आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरून प्रत्यक्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान नाही तर व्यावहारिक अनुभवही मिळेल, ज्यामुळे त्यांच्या करिअरसाठी मोठा फायदा होईल.

इंटर्नशिपचे तपशील -

कालावधी : १ ते ६ महिने
स्टायपेंड : २० हजार रुपये प्रति महिना
पात्रता : आयआयटी, एनआयटी आणि एआयसीटीई-मान्यताप्राप्त अभियांत्रिकी संस्थांतील विद्यार्थी

पहिल्या टप्प्यात निवड : ६०० विद्यार्थी
भविष्यातील योजना : हा प्रयोग यशस्वी झाल्यास पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाईल

केंद्रीय मंत्रालयाचे म्हणणे आहे की, या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल कौशल्ये, प्रकल्प व्यवस्थापनाचा अनुभव आणि आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा सराव मिळेल, ज्यामुळे त्यांचे भविष्यातील करिअर अधिक सक्षम आणि अनुभवसंपन्न बनेल.





  Print






News - World




Related Photos