हिंगणी–सेलू मार्गावर दुचाकींचा समोरासमोर अपघात : तरुणाचा मृत्यू, तरुणी जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : हिंगणी ते सेलू मार्गावर बुधवारी २८ दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी तरुणी गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अक्षय येरखेडे आहे. अक्षय एमएच-३१ एव्ही-९८८४ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणीकडून जात असताना समोरून येणाऱ्या निकिता मोहिजे हिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अक्षय जागीच मृत्यूमुखी पडला, तर निकिता गंभीर जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून प्रकरणाची नोंद घेतली असून, जखमी तरुणी निकिताला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस तपास करत असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. नागरिकांनी मार्गावर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अपघाताचा निष्कर्ष वाहनचालकांच्या नियमांचे पालन न केल्यामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
News - Wardha




Petrol Price




