महत्वाच्या बातम्या

 ३६ व्या एमईएमसी सप्ताहात सुरजागड आयर्न ओअर माइन्सचा सन्मान


- नागपूर येथे शाश्वत खाणकाम, पर्यावरण संरक्षण व महिला सहभागाचे ठळक प्रदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : नागपूर येथील हॉटेल रीजेंटा येथे ३६ व्या माइन्स एन्व्हायर्नमेंट अँड मिनरल कन्झर्व्हेशन (एमईएमसी) सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले. भारतीय खान ब्युरो (आयबीएम) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या वार्षिक कार्यक्रमात देशभरातील खाण उद्योगाशी संबंधित विविध भागधारकांनी सहभाग नोंदवला. पर्यावरण संरक्षण, शाश्वत व जबाबदार खाणकाम तसेच खनिज संवर्धनाशी संबंधित उत्तम पद्धतींचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

या प्रतिष्ठित कार्यक्रमात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) यांच्या सुरजागड आयर्न ओअर माइन्सने फुली मेकनाइज्ड ओपन कास्ट माइन्स या श्रेणीत संयुक्त द्वितीय पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार अल्ट्राटेक सिमेंटच्या नाओकारी लाइमस्टोन माइन्ससोबत संयुक्तपणे प्रदान करण्यात आला. विशेष बाब म्हणजे हा सन्मान एलएमईएल च्या महिला टीमने स्वीकारला, ज्यामुळे खाण क्षेत्रातील महिला सहभागाची सकारात्मक दखल घेण्यात आली.

कार्यक्रमास लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय खान ब्युरोचे अधिकारी तसेच विविध खाण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एलएमईएल तर्फे शाश्वत खाणकामाबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ग्रीन माइनिंग पद्धती, बँडेड हेमेटाईट क्वार्टझाईट (बीएचक्यू) चे बेनिफिशिएशन, स्लरी पाइपलाईन प्रकल्प, पेलेट प्लांट संचालन तसेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांचा समावेश होता.

एलएमईएल च्या महिला कर्मचाऱ्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेला आत्मविश्वासपूर्ण संवाद हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. महिला टीमने आपल्या व्यावसायिक अनुभवांचा आढावा मांडत खाण उद्योगातील समावेशकता व विविधतेबाबत आपले योगदान अधोरेखित केले. अधिकाऱ्यांनी या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.

टीमच्या यशाबद्दल अभिनंदन करत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी कंपनीच्या हरित, स्वच्छ व शाश्वत खाणकामाच्या दृष्टीकोनाचे कौतुक केले. राष्ट्रीय पातळीवर कंपनीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन करत महिला सक्षमीकरणाबाबत एलएमईएल ची कटिबद्धता पुनः अधोरेखित केली.


३६ व्या एमईएमसी सप्ताहात सुरजागड आयर्न ओअर माइन्सला विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी मिळालेले पुरस्कार

कमी दर्जाच्या खनिजांचे बेनिफिशिएशन व उपयोग : प्रथम पुरस्कार -
वनीकरण : प्रथम पुरस्कार
शाश्वत विकास : द्वितीय पुरस्कार
पद्धतशीर व शास्त्रीय विकास : तृतीय पुरस्कार
एकूण कामगिरी (ओव्हरऑल) : द्वितीय पुरस्कार

हे पुरस्कार शाश्वत खाणकाम, पर्यावरण संरक्षण व जबाबदार संसाधन व्यवस्थापनात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या नेतृत्वाची ठोस साक्ष देतात.





  Print






News - Gadchiroli




Related Photos