साखरा नजीक कत्तलीकडे जनावरे घेऊन धावणाऱ्या तिन आयशरवर घाटंजी पोलिसांची कारवाई : ६२ जनावरांची सुटका


विदर्भ न्युज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी : घाटंजी तालुक्यातील साखरा येथील चौफुली नजीक कत्तलीसाठी अवैधरित्या जनावरे वाहतूक करणाऱ्या तिन्ही आयशर वाहनांना घाटंजी पोलिसांनी पाठलाग करून जप्त केले. या कारवाईत एकूण ६४ जनावरे आढळली असून त्यातील ६२ जनावरे जिवंत तर २ जनावरे मृत अवस्थेत आढळली. सदर कारवाई मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घाटंजी - पारवा राज्य मार्गावर साखरा परिसरात करण्यात आली.
अमीर अली अस्लम अली (वय ३०, रा. कामगार नगर, नागपूर) आणि इरफान अहमद फिरोज अहमद (वय २८, रा. यशोदानगर, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन वाहनचालक मात्र घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवणी मार्गाने अवैधरित्या जनावरे भरून आयशर क्रमांक एम. एच. ४० सीटी. - २१९७, एम. एच. ४० सीएम. - २२४७ व एम. एच. ३४ बीजी. - ९१४३ ही तीन वाहने भरधाव वेगाने येत होती. रस्त्यावर काही बकऱ्यांना धडक दिल्याने नागरिकांनी या वाहनांचा पाठलाग करून पोलिसांना याची माहिती घाटंजी पोलीसांना दिली. घाटंजी पोलिसांनी घाटंजी शहरापासून या वाहनांचा पाठलाग करून साखरा गावाजवळ वाहने थांबवली. यावेळी वाहनांमध्ये जनावरांना निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तीन्ही वाहने घाटंजी पोलीस स्टेशनला जप्त करून जनावरांना घाटी येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे. एकूण ३२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल घाटंजी पोलीसांनी जप्त केला असून या प्रकरणी विविध कलमान्वये घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पसार आरोपींचा शोध घाटंजी पोलीस घेत आहे.
घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन राठोड, पोलीस उपनिरीक्षक विनाश जाधव, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे, ठाणेदार यांचे रायटर दिनेश जाधव, संदीप गोहणे, प्रलय खोबरकर, वाघमारे तसेच इतर पोलीस पथक पुढील तपास करत आहे.
News - Rajy




Petrol Price




