महत्वाच्या बातम्या

  राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून, तापमानात घट : राजकीय वातावरण तापण्याची शक्यता


- नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी वातावरण शीतल, राजकीय तापमान वाढणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून (८ डिसेंबर) प्रारंभ होणार आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, जमीन घोटाळे, नाशिक कुंभमेळ्याशी संबंधित वृक्षतोड आणि महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर तीव्र चर्चा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय गदारोळ होईल, अशी शक्यता आहे.

नागपूरचं राजकीय तापमान जसजसा अधिवेशन पुढे जाईल, तसतसा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तथापि, उत्तरेकडून वाहणारे अति थंड वारे नागपूरच्या वातावरणात आणखी थंडी आणणार आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदार, मंत्र्यांना आणि राजकीय नेत्यांना त्यांचे आरोग्य सांभाळावे लागेल.

वृद्ध थंडीचा फटका -
गेल्या काही दिवसांपासून नागपूर आणि विदर्भात थंडीची लाट आली आहे. तापमान १० ते १२ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. शनिवारी सकाळी नागपूरचे तापमान ८.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पुढील आठवड्यात तापमान आणखी २ डिग्री घटण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या नेत्यांना थंडीचा हिल स्टेशन अनुभव नक्कीच मिळेल.

नागपूर – महाराष्ट्राचे विंटर कॅपिटल -
नागपूर केवळ संत्री आणि सावजी मटनासाठी प्रसिद्ध नाही, तर विंटर कॅपिटल म्हणून देखील ओळखले जाते. १९६० पासून दरवर्षी डिसेंबर महिन्यात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आयोजित केल्या जाते. यामुळे राज्य सरकार काही काळासाठी नागपूरात स्थलांतरित होते. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर येणाऱ्या नेत्यांना वैदर्भीय पाहुणचाराची एक अनोखी ओढ लागलेली असते.

राजकीय चर्चेचे रंगत आणणारे मुद्दे -
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिला अत्याचार, जमीन घोटाळे आणि नाशिक कुंभमेळ्याच्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर उग्र चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे नागपूरचं राजकीय वातावरण आणखी तिखट होण्याची दाट शक्यता आहे.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात, शीतल वातावरण आणि तीव्र राजकीय चर्चांच्या मदतीने राज्याची राजकीय दिशा निश्चित केली जाणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos