विदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावे :श्रीपाद चितळे


-  जिल्हा माहिती कार्यालयात वाचना प्रेरणा दिन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
विदर्भ हा वैदीक काळा पासून अस्तित्वात आहे. रामायण, महाभारत, पाषाणयुग सोबतच मध्ययुगीन ऐतिहासिक काळाचा हा प्रांत साक्षीदार राहिला आहे. या प्रांताचा आणखी विदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावा, अशी अपेक्षा उत्तम संशोधक शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त श्रीपाद चितळे यांनी केली.
जिल्हा माहिती कार्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे, विभागीय ग्रंथपाल वि भा डांगे,  पत्रकार संदेश सिंगलकर उपस्थित होते.
श्रीपाद केशव चितळे यांचे बा.ज.जाधव, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांचे र. वा.शेंडे आणि विभागीय ग्रंथपाल श्रीमती वि भा डांगे यांचे शोभा मासुरकर यांनी स्वागत केले.  इंटरनेटच्या काळात सुलभ संदर्भ असले तरी वाचनाशिवाय सखोल व स्पष्ट माहिती मिळत नाही. यासाठी तरी या पिढीनी वाचनावर भर द्यावा.  पुढच्या पिढीला योग्य तो इतिहास माहित असावा म्हणून इतिहासाचे पुरावे असणे गरजेचे असते. विदर्भातील इतिहास संशोधनाचे केलेले कार्य हे अधिक जोमाने पुढे नेण्याचे गरज असल्याचे चितळे यांनी सांगितले. ऑक्टोबर २०१८ च्या लोकराज्य अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
   माजी राष्ट्रपती ए. पी. जे. कलाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात येते. वाचन हे बौद्धिक खाद्य असून वाचनाने सर्वांगीण विकास साधता येतो, असे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले तर संचालन व आभार शैलजा वाघ-दांदळे यांनी केले.  Print


News - Nagpur | Posted : 2018-10-16


Related Photos