महत्वाच्या बातम्या

 बनगाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित : ५० हजार नागरिक प्रभावित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सोमवारी (१०) वीजबिल न भरल्यामुळे बंद करण्यात आली आहे. यामुळे आमगाव आणि सालेकसा तालुक्यांतील ३६ गावांमध्ये पाणीपुरवठा पाच दिवसांपासून थांबला आहे, आणि ५० हजार नागरिक प्रभावित झाले आहेत.

एक महिन्याच्या आत ही योजना दुसऱ्यांदा बंद पडली आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासनावर टीका होत आहे. जिल्हा परिषद आणि इतर संबंधित संस्थांच्या दुर्लक्षामुळे ही योजना वारंवार थांबत असल्याचे दिसून येते.

योजना बंद पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे थकीत वीजबिल. याप्रतिरिक्त, पाइपलाइन गळती आणि देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी पैसे न दिल्यामुळे ही योजना सुरू राहणे कठीण होत आहे.

बनगाव योजनेसाठी ३६ गावांवर एकूण १ कोटी ३६ लाख २४ हजार रुपये थकीत आहेत. यामध्ये आमगाव तालुक्याची थकीत रक्कम ८६ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर सालेकसा तालुक्याची थकबाकी १२० लाख रुपयांवर आहे.

अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आणि वेळेवर बिलांची वसुली न झाल्यामुळे या योजनेसाठी कडव्या उपाययोजना आवश्यक आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos