महत्वाच्या बातम्या

  पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्राधिकारपत्र द्यावे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग व नाशिक विभाग पदवीधर तसेच औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागेकरीता भारत निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०२२ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये २ पदवीधर व ३ शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २०२२-२३ चा कार्यक्रम घोषित केला आहे. सदर निवडणुकीचे मतदान ३० जानेवारी २०२३ सोमवारला सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत तर मतमोजणी २ फेब्रुवारी २०२३ गुरुवारला होणार आहे.

सदर निवडणूकीच्या मतदान व मतमोजणीचे वृत्त संकलन/छायाचित्रण करण्याकरिता आणि मतदान केंद्रात प्रवेश मिळण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्राधिकारपत्रे देण्यासाठी शिफारशी भारत निवडणूक आयोगाकडे पाठवित असल्यामुळे प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना वरील निवडणुकांकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील अशा व्यक्तींची नावे, पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या २ प्रतिसह मतदान मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास ३ प्रतीसह, मूळ प्रत २ झेरॉक्स प्रत सोबतच्या विहित नमुन्यात माहितीसह या कार्यालयाकडे ६ जानेवारी २०२३ पर्यंत पाठविण्यात यावीत. छायाचित्रे पाठवितांना ती अलिकडच्या काळातील एक सारखी व रंगीत प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच ६ जानेवारी २०२३ नंतर या कार्यालयात प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाही.





  Print






News - Gadchiroli




Related Photos