महत्वाच्या बातम्या

 करूळ घाटात दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / सिंधुदुर्ग : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शुक्रवारी सायंकाळी करूळ घाटाला बसला. अचानक मोठे दगड कोसळल्याने घाटमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. काही काळ अवजड वाहतूक ठप्प राहिली होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पथकाने तत्काळ दगड हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. दुपारी घाट परिसरात मुसळधार सरी कोसळल्याने सायंकाळी मोठे दगड घसरून रस्त्यावर आले. काही वाहनचालकांनी स्वतःच रस्त्यावरील दगड हटवून एकेरी वाहतूक सुरू केली.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग प्राधिकरणाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व दगड हटवण्याची कामे केली. दरम्यान, गणेशोत्सवानंतरही करूळ घाटात मोठ्या दरडी कोसळल्याने तब्बल नऊ दिवस घाटमार्ग बंद ठेवावा लागला होता. तज्ज्ञ पथकाकडून सर्वेक्षण करून धोकादायक दरडी पाडण्याचे काम केले गेले. तरीदेखील घाटातील पडझड सुरूच असल्याने या सततच्या धोक्याला जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.





  Print






News - World




Related Photos