महत्वाच्या बातम्या

 आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के : गुवाहाटीत ५.८ तीव्रतेची नोंद


विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / गुवाहाटी : ईशान्य भारत पुन्हा हादरला आहे. आसाममध्ये रविवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी ४.४१ वाजता भूकंपाचे तीव्र झटके बसले. संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या भूकंपाचे मुख्य केंद्र उदलगुडी परिसर असून, जमिनीपासून पाच किलोमीटर आत केंद्रबिंदू नोंदविण्यात आला आहे.

गुवाहाटीत या भूकंपाची तीव्रता ५.८ इतकी नोंदली गेली. आसामसोबतच भूटान, पश्चिम बंगालच्या उत्तर भागात तसेच मेघालय, नागालँड आणि मणिपूरच्या काही भागातही हे धक्के जाणवले.

काही सेकंद सुरू असलेल्या या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासनाने लोकांना सुरक्षित राहण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, धक्क्यांनंतर आणखी हालचालींची शक्यता लक्षात घेऊन निगराणी वाढविण्यात आली आहे.

दरम्यान, अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच २ सप्टेंबर रोजीही आसाममध्ये भूकंप जाणवला होता. त्या वेळी सोनितपूर जिल्हा ३.५ तीव्रतेच्या धक्क्याने हादरला होता.





  Print






News - World




Related Photos