महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर : निवडणूक तयारी जोमात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्रात काही दिवसांत जिल्हा परिषद निवडणुका होणार असून, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. अध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या चर्चेनंतर आज राज्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले आहे. ठाणे, रायगड, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची यादी समोर आली आहे.

ठाणे, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ येथे अध्यक्षपद सर्वसाधारण वर्गासाठी राखीव करण्यात आले आहे.

राज्यभरातील जिल्ह्यांतील अध्यक्षपदांचे आरक्षण खालीलप्रमाणे आहे:

१. ठाणे - सर्वसाधारण (महिला)
२. पालघर - अनुसूचित जमाती
३. रायगड - सर्वसाधारण
४. रत्नागिरी - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
५. सिंधुदुर्ग - सर्वसाधारण
६. नाशिक - सर्वसाधारण
७. धुळे - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
८. नंदूरबार - अनुसूचित जमाती
९. जळगाव - सर्वसाधारण
१०. अहिल्यानगर - अनुसूचित जमाती (महिला)
११. पुणे - सर्वसाधारण
१२. सातारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१३. सांगली - सर्वसाधारण (महिला)
१४. सोलापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
१५. कोल्हापूर - सर्वसाधारण (महिला)
१६. छत्रपती संभाजीनगर - सर्वसाधारण
१७. जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१८. बीड - अनुसूचित जाती (महिला)
१९. हिंगोली - अनुसूचित जाती
२०. नांदेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग
२१. धाराशिव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
२२. लातूर - सर्वसाधारण (महिला)
२३. अमरावती - सर्वसाधारण (महिला)
२४. अकोला - अनुसूचित जमाती (महिला)
२५. परभणी - अनुसूचित जाती
२६. वाशिम - अनुसूचित जमाती (महिला)
२७. बुलढाणा - सर्वसाधारण
२८. यवतमाळ - सर्वसाधारण
२९. नागपूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
३०. वर्धा - अनुसूचित जाती
२१. भंडारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग
३२. गोंदिया - सर्वसाधारण (महिला)
३३. चंद्रपूर - अनुसूचित जाती (महिला)
३४. गडचिरोली - सर्वसाधारण (महिला)

राज्यात जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्याने नेत्यांनी मोर्चेबांधणीला वेग घेतला असून, भाजपासह सर्व प्रमुख पक्ष निवडणूक रणनितीवर काम करत आहेत. इच्छुक उमेदवार देखील सक्रिय झाले असून, काही दिवसांतच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





  Print






News - World




Related Photos