कोहमारा – भरधाव ट्रॅव्हल्सचा अपघात : सहा प्रवासी गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : नवेगाव-कोहमारा राज्य मार्ग क्रमांक ११ वरील चिखलीजवळ बुधवारी सकाळी ६:३० वाजता भरधाव ट्रॅव्हल्सने रस्त्यालगत उभ्या ट्रकला मागेहून दिलेल्या जोरदार धडकेत सहा प्रवासी गंभीर तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.
अपघातात जखमी -
जखमींमध्ये दसाराम सुहालाल पटले (४१), दिव्यांनी मोतीराम अनंत (६ महिने), अरुणा समसिंग नेता (३५), सरिता भागवत पटले (३०), फागिनीबाई टिकमसिंग भूवारिया (४५), चंद्रभान श्यामसिंग चतुर्वेदी (३४) यांचा समावेश आहे.
सर्व जखमींवर सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची घटना -
ट्रॅव्हल्स (क्रमांक सीजी ०८ बीबी ३७२०) हैद्राबादवरून रायपूरकडे निघाली होती.
चिखलीजवळ रस्त्यालगत उभ्या ट्रकला (क्रमांक सीजी ०८ एव्ही ८५५८) मागून जोरदार धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की ट्रॅव्हल्सचा समोरील भाग पूर्णतः नुकसानग्रस्त झाला
प्रवाशांचे आरोप : चालकाचा अति वेग नडला -
ट्रॅव्हल्समधील प्रवाशांनी सांगितले की, चालकाने अति वेगाने गाडी चालविल्याने हा अपघात झाला. हैद्राबादपासून येताना दोनदा अपघात टळला होता. वेगावर नियंत्रण सुटल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी -
या ट्रॅव्हल्समध्ये किमान ८० पेक्षा अधिक प्रवासी होते. दोन जणांची क्षमता असलेल्या सीटवर पाच पाच जणांना बसविण्यात आले होते. धडक होताच अनेक प्रवासी चेंडूसारखे बाहेर फेकले गेले.
सणासाठी परतणारे मजूर -
या ट्रॅव्हल्समधील बहुसंख्य प्रवासी हे हैद्राबादमध्ये मजुरी करणारे होते. गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावी परतत असतानाच हा अपघात झाला.
चालक पसार - गुन्हा दाखल -
अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
News - Gondia




Petrol Price




