आयपीएल २०२० : बंगळुरूचा 'गेम ओव्हर', हैद्राबाद-दिल्लीत रंगणार दुसरा क्वालिफायर सामना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अबुधाबी :
आयपीएलच्या 13 व्या सत्रातील एलिमिनेटर सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अबुधाबी येथे 6 गडी राखून हैदराबादने पराभव केला. बंगळुरूला १३१ धावांवर रोखण्यात हैदराबादला यश आलं. हैदराबादने 4 विकेट गमावून लक्ष्य गाठलं. केन विल्यमसनने (नाबाद 50) आणि जेसन होल्डर (नाबाद 24) यांनी संघाला विजय मिळवून दिला. अंतिम फेरीत जाण्यासाठी सनरायझर्स आता क्वालिफायर -२ मध्ये दिल्लीसोबत खेळतील. सनरायझर्सचा हा सलग चौथा विजय होता.
विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्रवास येथेच संपला. आरसीबी स्पर्धेतून बाहेर पडली आहे. त्यांचा हा सलग पाचवा पराभव होता.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचे फलंदाज अपयश ठरले. कोणालाच काही खास कामगिरी करता आली नाही. कर्णधार कोहली 6 रनवर आऊट झाला. एबी डिव्हिलियर्सने अर्धशतक झळकावले. पण संघाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. एबीने आयपीएल कारकिर्दीतील आपले 41 वे अर्धशतक झळकावले.
डीव्हिलियर्स टी-नटराजनच्या अचूक यॉर्करचा बळी ठरला. 43 बॉलमध्ये त्याने 56 धावा केल्या. हैदराबादकडून जेसन होल्डनने शानदार गोलंदाजी केली आणि 3 विकेट घेतल्या. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमवून फक्त 131 रन केले. हैदराबादच्या संघाने बंगळुरुवर विजय मिळवला.
  Print


News - World | Posted : 2020-11-07


Related Photos