महत्वाच्या बातम्या

 रस्ते विकास कामाला आशियाई विकास बँक अर्थसहाय्य योजनेतुन मंजुर प्रदान करावे : खासदार रामदास तडस


- खासदार रामदास तडस यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्याकडे मागणी

- मंत्री महोदयांनी दिले सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातुन आशियाई विकास बॅंक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या योजनेतुन आशियाई विकास बॅंकेंच्या नियमात बसणारे प्रमुख जिल्हा मार्ग, राज्यमार्ग व राज्य महामार्ग यांचा विकास केला जातो. या योजनेतुन वर्धा लोकसभा क्षेत्रातील अनेक प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आलेले आहे. या प्रस्तावांना मंजुर करावे, प्रदान करावे. या करिता वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी नागपूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविन्द्र चव्हाण यांची भेट घेऊन मागणी रेटून धरले.

वर्धा लोकसभा क्षेत्रातील प्रस्तावामध्ये प्रामुख्याने देवळी, हिंगणघाट व वर्धा तालुक्याला जोडणारा महत्वपुर्ण असलेला रस्ता तसेच सद्यस्थितीत पुर्णपणे झालेला क्षतीग्रस्त झालेला राज्यमहामार्ग दहेगांव-देवळी-वायगांव-कोर्सुला-कात्री, आष्टी तालुक्यातील मोर्शी-आष्टी-थार-पार्डी राज्यमहामार्ग हे दोन प्रमुख रस्ते आशियाई विकास बॅंकेच्या निकशामध्ये पात्र होऊ शकतात. ही बाब खासदार रामदास तडस यांनी मंत्री महोद्यांच्या लक्षात आणून दिले.

वर्धा लोकसभा क्षेत्रातील अनेक रस्ते अतिवृष्टीमुळे व जड वाहतुकीमुळे क्षतीग्रस्त झालेले आहे. या रस्त्यांना दुरुस्त करणे. गरजेचे असल्याने आज या विषयाचा पाठपुरावा करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविन्द्र चव्हाण यांची भेट घेऊन आशियाई विकास बॅंक योजनेतुन मंजुरी करिता मागणी केले आहे, या मागणीवर मंत्री महोद्यांनी सकारात्मक आश्वासन दिले. असुन या विषयावर कार्यवाही होईल, असे मत यावेळी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.





  Print






News - Wardha




Related Photos