माजी राष्ट्रपती स्व.डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा दिवस माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात यावे असे शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशानुसार कळविण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये,शासकीय संस्था/ मंडळ, सार्वजनिक उपक्रम इ. कार्यालयांनी देखील विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे. याबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
ऑनलाईन कार्यक्रम/चर्चासत्रे/प्रशिक्षण ही कोविडच्या पार्श्वभूमीवर काळाची गरज आहे . ही बाब लक्षात घेता वाचन संस्कृती वाढीस लागण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावे. जिथे प्रत्यक्षरित्या कार्यक्रम करणे शक्य आहे तिथे केंद्र शासन/ राज्य शासन यांनी आखून दिलेल्या कोविड मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. "वाचन संस्कृती" जोपासण्यासाठी सर्वांनी आपले मित्र, कुटुंबातील सदस्य इत्यादींना किमान एक पुस्तक पीडीएफ स्वरुपात ऑनलाईन पद्धतीने पाठवून त्यांना वाचनास प्रोत्साहन द्यावे. Whats App, Internet, Facebook, Twitter  अशा प्रकारच्या सामाजिक प्रसार माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धींगत होईल/ वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश प्रसारीत करावेत. मराठी वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी डिजीटल माध्यमाचा जास्तीत जास्त वापर करुन मराठीतील साहित्य स्वयंस्फुर्तीने वाचकांना पाठवावे. सर्व संस्थांनी सोशल मीडियावर मराठी वाचन कट्टा निर्मिती करावी. "वाचन संस्कृती" वाढीस लागावी तसेच विद्यार्थ्यांना मराठी भाषेशी संलग्न रोजगाराच्या संधीची माहिती या दृष्टीने रोजगारभिमुख चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे. उदा. व्यवसायिक लेखक कसे बनावे, अनुवाद कसा करावा, संहिता लेखन, गीत लेखन इत्यादी. सर्व संस्थांनी आपल्या स्तरावर मराठी डिजिटल साहित्य संमेलनाचे आयोजन करावे. विकीपीडीया सारख्या माध्यमावर मराठीत  जास्तीत जास्त लेखन व्हावे याकरीता यासंबधीच्या कार्यशाळा आयोजीत करण्यात याव्यात. 
सदर कार्यक्रम साजरा करताना कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासन/ राज्य शासन यांच्या मार्गदर्शन सूचनांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

 




  Print






News - Gadchiroli | Posted : 2020-10-08






Related Photos