जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते राज्यस्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन


- राज्यस्तरीय शालेय सेपक टकरा स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वर्धा : राज्यातील शालेय खेळाडूंना क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या राज्यस्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेचे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, यशवंत महाविद्यालयाचे संचालक समीर देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, वर्धा जिल्हा सेपक टकरा संघटनेचे सचिव डॉ. विनय मुन आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १४,१७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धांचे आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सुमारे ४५० खेळाडू सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दर्शन हस्ती, गणेश याल्लावार, अनिल निमगडे, सांजली वानखडे, मंजुषा जाधव, सायली चन्नावार, विश्वास बोकडे, रवी काकडे, योगेश कुकडे, अशोक पेढेकर, नाना टेकाम तसेच जिल्हा सेपक टकरा संघटनांचे प्रतिनिधी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदीप खोब्रागडे यांनी मानले.




Petrol Price




