महत्वाच्या बातम्या

 अनुसुचित जमातीच्या उमेदवांरा करीता स्पर्धापुर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धापुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. 

सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD ) व अनुसूचीत जमातीचे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधी साडे तीन महीने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.१००० ( एक हजार रुपये ) विदयावेतन दिले जाईल तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना स्पर्धा परिक्षेसंबंधी ४ पुस्तकांचा संच मोफत दिल्या जाईल. 

कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत.तसेच अर्ज २६ नोव्हेंबर,२०२६ पर्यत या कार्यालयात सादर करावेत. तदनंतर मुलाखत २७ नोव्हेंबर २०२६ रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे त्याकरीता उपस्थ‍ित राहावे अधिक माहितीसाठी ८८३०८४४७३७ या क्रमाकांवर संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.





  Print






Related Photos