महत्वाच्या बातम्या

 काटोल वखार केंद्रातील साठा सोयीसुविधा व सवलतीचा लाभ घ्यावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपुर : महाराष्ट्र राज्य महामंडळ शासनाचा सार्वजनिक उपक्रम असून राज्यभरात गोदामाचे जाळे निर्माण करून औद्योगिक व कृषी क्षेत्रास अन्नधान्याची नासाडी होऊ नये, म्हणून साठवणूकीची सुविधा पुरविण्यासाठी जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या काटोल केंद्रावर उपलब्ध करुन दिली आहे. वखार केंद्र गोदामामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने शेती व औदयोगिक मालाची साठवणूक केले जाते. या सोयीसुविधा व सवलतीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वखार महामंडळाच्या काटोल केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

सवलती

ठेवीदारांना दिलेली महामंडळाची वखारपावती परक्राम्य लेख (नेगोटीअबले  इन्स्ट्रुमेंट) असल्याने ती बँकेकडे तारण ठेवल्यास ठेवीदारांना बँकेकडून त्वरीत कर्ज उपलब्ध होते. त्याआधारे शेतकऱ्यांना हंगामात अर्थ सहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत गोदामात साठवणूकीची सोय मिळते. शेतकऱ्यांनी चालू पिकाचा सातबारा उतारा दिल्यांनतर वखार भाड्यात प्रचलित साठवणूक दराच्या ५० टक्के सवलत देवून २५ टक्के जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. याशिवाय, प्रत्येक पंधरवड्यामध्ये किड प्रतिबंधात्मक व दर तीन महिन्यांनी उपचारात्मक किटकनाशकाच वापर करून माल सुरक्षित ठेवण्यात येतो. साठवणूकीस असलेल्या सर्वमालाचा १०० टक्के विमा संरक्षण दिले जाते. त्यामुळे नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई दिल्या जाते.

काटोल वखार केंद्र  येथील ‘गोदाम लॉक ऑन की’ किंवा आरक्षणांतर्गतही देण्यात येतील. या शिवाय  वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी अभिनव ऑनलाईन तारण कर्ज योजना ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पात्र शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनींना वखारपावतीवरील शेतमालाच्या किंमतीच्या ७० टक्के कर्ज बँकेकडून संबधिताच्या खात्यात आरटीजीएस अथवा एनईएफटीव्दारे जमा करण्यात येते.

सुविधा

तारण कर्जाचा व्याजदर ९ टक्‍के असून तुलनेत सर्वात कमी आहे. महामंडळाच्या गोदामात साठवणुकीत ठेवण्यात येणाऱ्या शेतमालाच्या वखारपावतीवर ऑनलाईन तात्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने संबंधित शेतकरी ठेवीदारांची वेळेची बचत होऊन कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होते. शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या सुविधांचा लाभ सुगीच्या काळात व्यापाऱ्यांना माल न विकता वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा, असे, आवाहन वखार महामंडळ काटोल केंद्राचे साठा अधीक्षक मुकेश कोकर्डे यांनी केले आहे.






  Print






News - Nagpur




Related Photos