महत्वाच्या बातम्या

 कोहमारा येथे भीषण अपघात : भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : नागपूर - रायपूर राष्ट्रीय महामार्गावर आज शनिवारी सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने सायकलस्वारास जबर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी अंदाजे ९.४५ वाजण्याच्या सुमारास नवेगावबांध रोड चौकाजवळ घडली.

मृत व्यक्तीची ओळख प्राथमिक तपासात सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली गावातील रहिवासी म्हणून झाली असून तो आपल्या सायकलवरून कामानिमित्त सडक अर्जुनीकडे जात होता. याच दरम्यान, नागपूरकडून रायपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक (क्रमांक NL०१ AE ७१३४) ने त्याला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, संबंधित व्यक्ती ट्रकच्या चाकाखाली येऊन अक्षरशः चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दरम्यान, पोलिसांनी संबंधित ट्रक व त्याचा चालक ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.





  Print






News - Gondia




Related Photos