महत्वाच्या बातम्या

 प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत २ हजार ८८१ माताच्या बँक खात्यात रक्कम वर्ग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत गरोदरपणा पासुन ते बाळाच्या जन्मा पर्यंत तिन टप्प्यात ५ हजार रुपये मिळतात. या साठी १५० दिवसांच्या आत शासकीय संस्थेत गरोदरपणाची नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र या योजने अंतर्गत मातांचा बँक खात्यावर अनुदाची रक्कम वर्ग करण्यासाठी असलेल्या सुविधेत काही महिन्यापासुन राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक अडचण निर्माण झालेली होती. ही अडचण दुर होताच आरोग्य प्रशासनाने एकुण २ हजार ८८१ मातांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्यांच्या दुसऱ्या आठवडयात वर्ग करण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी संजय मीना व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शिवाद यांनी गडचिरोली जिल्हयातील दुर्गम व अतिदुर्गम कार्यक्षेत्रातील योजनेसाठी पात्र मातांना वेळेत लाभ मिळावा, यासाठी आढावा घेवून जास्तीत जास्त आधार कार्ड व बँक खाते उघडण्याबाबतच्या सुचना आरोग्य खात्याला नुकताच  दिले असुन, मातांच्या बँक खात्यात पहिला हप्ता, दुसरा हप्ता व तिसरा हप्ता वर्ग झाल्याने मातांमध्ये आनंदाची बातमी पसरली आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गडचिरोली डॉ. दावल साळवे, यांनी जास्तीत जास्त मातांची नोंदणी करण्यासाठी आरोग्य विभाग नेहमी अग्रेषित असल्याबाबतची माहिती दिले. डॉ.स्वप्नील एस बेले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, जि.प.गडचिरोली, डॉ. स्वप्नील एस बेले जिल्हयाचे उद्दीष्टे पुर्ती करुन नोंदणी केलेल्या मातांना लाभ मिळेल यासाठी आरोग्य यंत्रणा काम करीत असल्याबाबतचे सांगितले, पुढील तिन महिन्यात पोस्टल बँक खाते आणि आधार कार्ड शिबीरांचे आयोजन करुन वंचित व नविन मातांना लाभ घेण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे, याबाबत माहिती जिल्हा कार्यक्रम समन्वयक, पी.एम.एम.व्ही.वाय, जि.प.गडचिरोली अश्विनी मेंढे, यांनी दिले.

योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या आशा स्वयंसेविका/आरोग्य सेविका/उपकेंद्र/प्राथमिकआरोग्य केंद्र/तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.





  Print






News - Gadchiroli




Related Photos