महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२९ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१८९४ : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.

१९२२ : बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.

१९५८ : महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान.

१९६१ : संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.

१९६४ : टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.

१९९४ : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.

१९९६ : स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली.

१९९६ : मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.

१९९७ : माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला माणिकर‍त्‍न पुरस्कार गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर.

१९९७ : अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.

१९९९ : चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.

२००५ : दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.

२००८ : डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.

२०१५ : चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.

२९ ऑक्टोबर जन्म

१८९७ : जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते जोसेफ गोबेल्स यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९४५)

१९३१ : साहित्यिक व पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०००)

१९७१ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांचा जन्म.

१९८५ : इंग्लिश मोटरसायकल रेसर कॅल क्रचलो यांचा जन्म.

१९८५ : भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म.

१९३४ : भारतीय राजकारणी, खासदार माणिकराव होडल्या गावित यांचा जन्म (मृत्यू : १७ सप्टेंबर २०२२)

१९३२ : १६६२ नंतर अमेरिकेत फाशीची शिक्षा मिळणाऱ्या पहिल्या महिला वेल्मा बारफिल्ड यांचा जन्म (मृत्यू : २ नोव्हेंबर १९८४)

१९३१ : भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते वाली यांचा जन्म (मृत्यू : १८ जुलै २०१३)

१८८९ : चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सह-संस्थापक ली डझाओ यांचा जन्म (मृत्यू : २८ एप्रिल १९२७)

१२७० : भारतीय संत संत नामदेव यांचा जन्म (मृत्यू : ३ जुलै १३५०)

२९ ऑक्टोबर मृत्यू

१९११ : हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८४७)

१९३३ : फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८६३)

१९७८ : भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १८९५)

१९८१ : अभिनेते दादा साळवी यांचे निधन.

१९८८ : मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९०३)

२०२० : गुजरातचे १०वे मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन (जन्म: २४ जुलै १९२८)

१९७१ : स्वीडिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार अर्ने टिसेलियस यांचे निधन (जन्म: १० ऑगस्ट १९०२)

१९५७ : एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक लुईस बी. मेयर यांचे निधन (जन्म: ४ जुलै १८८२)

१८०४ : इंग्रजी उपदेशक, पहिल्या महिला मेथोडिस्ट उपदेशक सारा क्रॉसबी यांचे निधन (जन्म: ६ ऑक्टोबर १७२९)

१३३९ : ग्रँड प्रिन्स ऑफ ट्वेर ग्रँड प्रिन्स अलेक्झांडर मिखाइलोविच यांचे निधन (जन्म: ७ ऑक्टोबर १३०१)





  Print






Related Photos