चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील तलाठ्यावर २ हजारांची लाच स्वीकारल्यावरून कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
शेतीच्या फेरफार करण्याच्या कामासाठी २ हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील तलाठ्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.
विलास लहुजी नागपुरे (५४)  असे लाचखोर तलाठ्याचे नव आहे. तक्रारदार पिंपळनेरी येथीलच रहिवासी आहे. त्यांनी तलाठी विलास नागपुरे याच्याकडे फेरफारसाठी रितसर अर्ज केला होता. मात्र शेतजमिनीचे फेरफार अद्याप करण्यात आले नाही. यामुळे तक्रारदाराने तलाठ्यास विचारणा केली असता ३ हजारांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाडे धाव घेतली. आज ६ आॅक्टोबर रोजी सापळा रचून तलाठी विजय नागपूरे ला दोन हजारांची लाच घेतांना कारवाई केली. चिमूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डी.एम. घुगे, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, नापोशि सुभाष गोहोकर, संतोष येलपुलवार, पोलिस शिपाई रविंद्र ढेंगळे, चालक शिपाई राहुल ठाकरे यांनी केली आहे.

 



  Print






News - Chandrapur | Posted : 2018-10-06






Related Photos