महत्वाच्या बातम्या

 नव्या वर्षात जानेवारी महिन्यात ११ दिवस बँका राहणार बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : डिसेंबर महिना संपायला फक्त काही दिवस शिल्लक आहेत आणि लवकरच नवीन वर्ष २०२३ सुरू होणार आहे. पण नव्या वर्षात पहिल्याच महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार आहेत.
बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. रोख व्यवहार करण्यापासून ते चेक, ड्राफ्ट्स जमा करण्यापर्यंत अनेक कामांसाठी बँकेत जावे लागते. अशा स्थितीत बँकेला लागलेल्या सुट्ट्यांमुळे सर्वसामान्य ग्राहकांना अनेकवेळा मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. ग्राहकांच्या सोयीसाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी करते. जेणेकरुन ग्राहकांना बँकेशी संबंधित काम लवकरात लवकर करता येतील.
RBI च्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरनुसार जानेवारी २०२३ मध्ये एकूण ११ दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्वाचे कामे जानेवारीमध्ये करण्याचा विचार करत असाल तर ते आधीच पूर्ण करा. अशा परिस्थितीत, तुम्हाला जानेवारी २०२३ मध्ये बँक हॉलिडेमुळे होणाऱ्या अडचणींना टाळायचे असेल तर सुट्ट्यांची राज्यनिहाय यादी तपासू शकता आणि आपल्या कामाचे नियोजन करू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यांतील सुट्ट्या स्थानिक सणांनुसार ठरवल्या जातात.

जानेवारी २०२३ मध्ये बँकांच्या सुट्ट्यांची यादी 

१ जानेवारी - रविवार (देशभर बँका बंद राहतील)
२ जानेवारी (नवीन वर्षाच्या उत्सवानिमित्त बँका बंद राहतील)
३ जानेवारी- सोमवार (इमोइनू इरतपा निमित्त इम्फाळमध्ये बँका बंद राहतील)
४ जानेवारी- मंगळवार (इम्फाळमध्ये बँका बंद राहतील)
८ जानेवारी- रविवार (देशभर बँका बंद राहतील)
१४ जानेवारी - मकर संक्रांती (दुसरा शनिवार)
१५ जानेवारी- पोंगल / माघ बिहू / रविवार (सर्व राज्यांसाठी सुट्टी)
२२ जानेवारी - रविवार
२६ जानेवारी- गुरुवार - (प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील)
२८ जानेवारी- चौथा शनिवार
२९ जानेवारी-रविवार

बँक बंद असताना अशा प्रकारे पूर्ण करा तुमचे काम पूर्ण करावे. एखाद्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा बँकेच्या सुट्टीत कोणाकडून पैसे घ्यायचे असतील, तर तुम्ही यासाठी नेट बँकिंग वापरू शकता. त्याचवेळी, तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम वापरू शकता. यासोबतच तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड आणि UPI द्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकता.





  Print






News - Rajy




Related Photos