महत्वाच्या बातम्या

 राज्यातील सर्व शाळांसाठी टेलिग्राम चॅनल सुरू होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने १९ डिसेंबर रोजी रात्री टेलिग्राम चॅनेल सुरु करणाऱ्याची घोषणा केली. हे टेलिग्राम चैनल राज्यातील सर्व शाळा शिक्षक शिक्षण विभागातील कर्मचारी अधिकारी वापरतील जेणेकरून कोणतीही माहिती एकाच वेळी सर्वांना एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालकांनी ही माहिती दिली आहे.
राज्यातील शालेय शिक्षण विभागाची विविध धोरणे, निर्णय, परिपत्रके, प्रशिक्षण, सर्वेक्षण, स्पर्धा व अनुषंगिक बाबी यांची माहिती एकाचवेळी व्हावी व त्यानुसार शाळास्तरावर आवश्यक कार्यवाही, नियोजन करणे सोईचे होण्यासाठी आवश्यक माहिती वेळेवर मिळणे गरजेचे आहे. यासाठी राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापक/ प्राचार्य, सर्व शिक्षक यांच्यासाठी टेलिग्राम चॅनेल सुरू करण्यात येत आहे.

शिक्षणाच्या धोरणाचे नियोजन करण्यासाठी फायदा
तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराच्या सहाय्याने सर्व शाळा, सर्व शिक्षकांना अद्ययावत माहिती पोहचविण्यासाठी हे आवाहन केले जात आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद संचालक राजेश पाटील यांनी ट्विटरवरून दिली आहे. यासंदर्भात शिक्षक नेते सुभाष मोरे यांनी या शासन निर्णयाचे स्वागत केलेले आहे. त्यांनी सांगितले की, सर्व शिक्षण विभागातील कर्मचारी शिक्षक मुख्याध्यापक अधिकारी वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांना एकाच वेळी सर्व शासन निर्णय परिपत्रके यांची माहिती होईल. परंतु, याचा गतीने उपयोग केल्यास शाळाबाह्य मुलांची संख्या स्पेशल नीट चिल्ड्रन विशेष गरज असलेल्या मुलांची संख्या तसेच शिक्षणाच्या धोरणाचे नियोजन करण्यासाठी केल्यास अधिक चांगला उपयोग होऊ शकतो असाही अंदाज वर्तवला आहे.  





  Print






News - Rajy




Related Photos