मुसळधार पावसाने झोडपले, सात राज्यांत आतापर्यंत ७७४ जणांचा मृत्यू


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :    मुसळधार  पावसामुळे  अनेक राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  मोठ्या प्रमाणात वित्त हानीसुद्धा  झाली आहे.  अतिवृष्टीमुळे सात राज्यांत मुसळधार पावसानं आतापर्यंत ७७४  जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. 
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे  परिस्थिती बिघडलेली आहे. त्याच दरम्यान हवामान खात्यानं उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशसमवेत १६  राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय आणीबाणी प्रतिसाद केंद्रा(एनईआरसी)नुसार, पूर आणि मुसळधार पावसानं केरळ राज्यात १८७ , उत्तर प्रदेश १७१, पश्चिम बंगाल १७० आणि महाराष्ट्रात १३९  जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये ५२, आसाममध्ये ४५, नागालँडमध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये २२  आणि पश्चिम बंगालमध्ये पाच लोक बेपत्ता आहेत. सात राज्यांमध्ये मुसळधार पावसानं २४५  लोक जखमी झाले आहेत.
केरळमध्ये ८ हजार कोटींहून अधिक नुकसान
केरळमध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे मृतांची संख्या ३९  च्या वर गेली आहे. इदुक्कीमध्ये २०.८६   मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच पावसानं राज्यात ८  हजार कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान झालं आहे.   Print


News - World | Posted : 2018-08-13


Related Photos