महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली-वडसा रेल्वेचे संपूर्ण अधिग्रहण येत्या ३ महिन्यात पूर्ण होणार


- आमदार डॉ. देवराव होळी यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा 

- ७६ टक्के जमिनींच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण उर्वरीत २४ टक्के येत्या ३ महिन्यांमध्ये सक्तीने करणार 

- गडचिरोली तेलंगाना नवीन रेल्वे मार्ग मंजूर करण्याची केली विनंती 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : वडसा रेल्वे मार्गाला मंजुरी मिळून अनेक वर्ष होत असून अजून पर्यंत रेल्वेचे काम प्रत्यक्षपणे सुरू न झाल्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. या रेल्वे मार्गाकरिता केंद्र व राज्य सरकारनेही निधी उपलब्ध करून दिल्याने या रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी अशी विनंती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करताना केली.

यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ७६ टक्के जमिनींच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या ३ महिन्यांमध्ये उर्वरित २४ टक्के जागेचे सक्तीने भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिली.

या चर्चेदरम्यान आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी गडचिरोली तेलंगाना हा नवीन रेल्वे मार्ग मंजूर केल्यास जिल्ह्यातील जनतेला तेलंगाना व आंध्र प्रदेश राज्याला जोडण्याचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे या मार्गाला देखील लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी मागणी या चर्चेच्या दरम्यान आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी मंत्री महोदयांना केली.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अरुण भाऊ हरडे प्रामुख्याने उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos