ब्रम्हपुरी - वडसा मार्गावर दोन दुचाकींची धडक, दोन ठार, तीन गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज ५ आॅक्टोबर रोजी रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान ब्रम्हपुरी - देसाईगंज मार्गावर घडली. दीपक दोनाडकर रा. वडसा आणि नरेश लोखंडे रा. ब्रम्हपुरी अशी मृतकांची नावे आहेत. या अपघातात अल्तमश कुरेशी, हर्ष शेंडे आणि   संजय हिजीत नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार वडसा येथील अल्तमश कुरेशी, दीपक दोनाडकर आणि हर्ष शेंडे हे रोज ब्रम्हपुरी येथे बाॅक्सिंग प्रशिक्षणासाठी जातात. आज एमएच ३६  आर २९५४ क्रमांकाच्या दुचाकीने तिघेही ब्रम्हपुरी येथून वडसाकडे परत येत होते. दरम्यान ब्रम्हपुरी येथील नरेश लोखंडे आणि संजय हिजीत हे ब्रम्हपुरीकडे जात होते. नरेश आणि संजय हे दोघेही दारूच्या नशेत होते. दरम्यान दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोघेजण घटनास्थळीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच वडसा येथील काही युवकांनी धाव घेत जखमींना देसाईगंज ग्रामीण रूग्णालयात पोहचविले. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मांडवकर तसेच नगर परिषदेचे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा यांनी रूग्णालय गाठले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-05


Related Photos